Home क्राइम महाजनांचे बीएचआर घोटाळ्याचे धागेदोरे उघडकीस

महाजनांचे बीएचआर घोटाळ्याचे धागेदोरे उघडकीस

126
0

मराठवाडा साथी न्यूज

जळगाव: बीएचआर क्रेडीट सोसायटीमधील अवसायकाच्या काळातील गैरव्यवहाराच्या गुन्ह्यातील संशयित उद्योजक सुनील झंवर याच्या खान्देश काम्प्लेक्समधील कार्यालयात माजी मंत्री महाजन यांच्या लेटरपॅडसह कागदपत्र सापडल्याचे वृत्त आहे. तसेच याच कार्यालयातून महापालिकेचा स्वच्छतेचा मक्ता असलेल्या वाटरग्रेस कंपनीची कागदपत्रे तसेच मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांची एटीएम कार्ड मिळाल्याची माहीती आहे. दरम्यान कागदपत्रे सापडली आहेत. मात्र, ती कुणाशी संबधित आहे याचा तपास करीत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुसरीकडे गुन्ह्याती संशयित सुनिल झंवर, अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह सहा जणांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.#Mahajan#BHR

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here