Home इतर छत्तीसगडमध्ये नक्षल्यांचा हल्ला ; नाशिकचा जवान शहीद…!

छत्तीसगडमध्ये नक्षल्यांचा हल्ला ; नाशिकचा जवान शहीद…!

433
0

मराठवाडा साथी न्यूज

सुकमाच्या ताडमेटला परिसरात शनिवारी रात्री नक्षलवाद्यांनी दोन सुरुंग स्फोट घडवून आणले. त्यानंतर सुरक्षा बलाच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबारही केला. या स्फोटांत रात्री गस्तीला निघालेले ‘कोब्रा २०६’ बटालियनचे १० जवान जखमी झाले.

त्यात सहाय्यक कमांडंट नितीन भालेराव यांचा समावेश होता. जखमी जवानांना उपचारासाठी तात्काळ रायपूर येथे विमानाने हलविण्यात आले होते. मात्र, भालेराव यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात दु:खद मृत्यू झाला.

नाशिक येथील अमरधाममध्ये रविवारी(२९नोव्हें.)सायंकाळी नितीन भालेराव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रायपूर येथून त्यांचे पार्थिव नाशिकच्या ओझर विमानतळावर आणण्यात आले. तेथून नाशिकमधील राजीवनगर येथील निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. कुटुंबीय व नातलगांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर अमरधाम येथे सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला होता. साश्रूनयनांनी सर्वांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. पालकमंत्री छगन भुजबळ आणि खासदार हेमंत गोडसे यांनी नितीन भालेराव यांना श्रद्धांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here