Home क्रीडा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी समोर!

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी समोर!

295
0

लवकरच आयपीएलचा 16वा सीझन सुरू होणार आहे . चाहतेही उत्सुक झाले आहेत असून यंदाची आयपीएलच्या 16 व्या सीझनची ट्रॉफी जिंकण्यासाठी 10 संघ मैदानात उतरण्यास सज्ज झाले. नेहमीप्रमाणेच यंदाच्या आयपीएलमध्येही सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांच्यावर सर्वांच्या नजर असणार आहे. रोहित शर्मा, एमएस धोनी आणि विराट कोहली हे आयपीएलचे स्टार खेळाडू आहेत.आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित आणि धोनी टॉप 2 मध्ये आहेत. आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या कामगिरीबद्दल सांगायचं झाले तर मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या रोहित शर्माने सर्वाधिक कमाई केली आहे. रोहितने सर्वाधिक 178.6 कोटी कमाई केली आहेत.रोहितनंतर आयपीएलच्या पगारातून सर्वाधिक कमाई करणारा दुसरा खेळाडू म्हणजे एमएस धोनी. चेन्नई सुपर किंग्जला धोनीने 4 वेळा विजेतेपद पटकावून दिले आहे. धोनीने 176.84 कोटी कमवले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहली आयपीएलच्या 15 व्या सीझनमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याने 173.2 कोटींची कमाई केली आहे. गेल्या वर्षी कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here