Home मुंबई चित्रा वाघ यांची ठाकरे सरकारकडे मागणी…

चित्रा वाघ यांची ठाकरे सरकारकडे मागणी…

343
0


मराठवाडा साथी न्यूज
मुंबई :शनिवारची पहाट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरली. मध्यरात्री झोपेत असताना दहा नवजात बालकांवर काळाने घाला घातला. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. मध्यरात्री ही घटना घडली. भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास आलं. नर्सने दार उघडून बघितलं असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. नर्सने लागलीच ही माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली.


भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा किशोर वाघ यांनी सांगितलं आहे . “भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना कळताच मन सुन्न झाले.सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी. भविष्यात अशी हानी पुन्हा होऊ नये म्हणून प्रत्येक सरकारी हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्र fपाहिजे आणि ते कसे वापरावे याचं प्रशिक्षण दिले गेले पाहिजे”, अशी मागणी त्यांनी उद्धव ठाकरे सरकारकडे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here