Home मुंबई ‘बिहारच्या विजयात माझा खारीचा वाटा’ – विरोधीपक्ष नेते फडणवीस

‘बिहारच्या विजयात माझा खारीचा वाटा’ – विरोधीपक्ष नेते फडणवीस

319
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि एनडीए १२५ जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर महाआघाडी ११० जागाच जिंकू शकली.’मोदी मॅजिक’ने तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंग केले. निवडणुकीत भाजपाने ७४ जागांवर विजय नोंदवला, तर जेडीयूला ४३ जागा मिळाल्याने आणि राजदने ७५ जागांवर विजय संपादन केला, मात्र त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसला १९ जागा मिळाल्या.

भाजपने बिहारच्या निवडणुकांचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवत त्यांची बिहारच्या प्रभारीपदी निवड केली होती. यावेळी महाराष्ट्र राज्यातील विरोधी पक्षनेत्याच्या जबादारी सोबतच बिहारमधील प्रचाराची जबाबदारी देखील पार पडली होती. यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सद्या त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

बिहारमध्ये भाजपने जेडीयूसोबत निवडणूक लढवली आणि बहुमताचा आकडा गाठला. तेजस्वी यादव यांनी कडवी टक्कर दिली असली तरी भाजपला आपल्या जागा वाढवण्यात यश आल्यानंतर अनेक नेत्यांनी याचं श्रेय बिहार निवडणुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांना दिलं आहे.

यासंबंधी एका वृत्तवाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘या यशाचं श्रेय हे पूर्णपणे राष्ट्रीय नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे. बिहारच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. अमित शाह यांच्यासह जे.पी. नड्डा यांनी देखील पक्षाच्या रणनीतीची कष्ट घेतले आहेत. यात माझा फक्त खारीचा वाटा आहे’, असं ते म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here