Home इतर प्रभासचा ‘आदिपुरुष’ या दिवशी होणार प्रदर्शित

प्रभासचा ‘आदिपुरुष’ या दिवशी होणार प्रदर्शित

124
0

मराठवाडा साथी न्यूज

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याचा नवीन चित्रपट ‘आदिपुरुष’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. त्यामुळे हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार हा एकच प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. आदिपुरुष या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यानुसार, ११ ऑगस्ट २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अजून बराच वेळ या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे.दरम्यान,हा चित्रपट श्रीरामचंद्रावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटात प्रभास ‘प्रभू श्रीरामाच्या’ भूमिकेत दिसणार आहे. तर, सैफ ‘रावणाची’ भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 3D एक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून भूषण कुमार या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. २०२२ मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here