Home राजकीय मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळू शकतो शांततेचा नोबेल?

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळू शकतो शांततेचा नोबेल?

222
0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरात लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळख आहे.आपल्या यशस्वी राजकीय कारकिर्दिने त्यांनी जगभरात प्रभावशाली नेते म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. गेल्या ९ वर्षांपासून मोदी जागतिक स्तरावर देशाचे नेतृत्व करत आहेत. आता चक्क शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

नोबेल पुरस्कार समितीच्या सदस्यानेच पंतप्रधान मोदींचे कौतूक केले आहे. त्यामुळे आगामी काळात कदाचित भारतीयांना नोबेल पुरस्काराशी संबंधित मोठी बातमी ऐकायला मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या नोबेल पारितोषिक समितीची टीम नॉर्वेहून भारत दौऱ्यावर आली आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार ठरवण्याची जबाबदारी या समितीकडे आहे. भारत दौऱ्यावर आले असताना या समितीच्या उपनेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींसारख्या शक्तिशाली नेत्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याची प्रचंड क्षमता आहे.

एसले तोजे असे या उपनेत्याचे नाव असून त्यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, “आम्हाला नोबेल शांतता पुरस्कारासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय नामांकने मिळत आहेत. आशा आहे की जगातील प्रत्येक नेता नोबेल शांतता पुरस्कारासाठी आवश्यक असलेले काम करेल. मी मोदींच्या प्रयत्नांना अनुसरत आहे.

एसले म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदी रशिया, अमेरिका आणि चीनच्या प्रमुखांशी युद्धाबाबत बोलले आहेत. त्यांनी आगामी भविष्य युद्धाचे नाही तर शांततेचे असावे, असे सांगितेल आहे. मला आनंद आहे की मोदी केवळ भारताला पुढे नेण्याचे काम करत नाहीत तर जगातील शांततेसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवरही ते काम करत आहेत.

दरम्यान, नॉर्वेमधील भारतीय मूळाचे खासदार हिमांशू गुलाटी यांनीही येत्या काळात अनेक भारतीय नोबेल पुरस्कारासाठी नामांकित होतील, असे म्हटले आहे. जगात शांतता राखण्यासाठी पंतप्रधान मोदींची भूमिका महत्त्वाची आहे, असे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here