Home अर्थकारण १ एप्रिलपासून १२ हजार रुपये महाग होणार ही कार जाणून घ्या

१ एप्रिलपासून १२ हजार रुपये महाग होणार ही कार जाणून घ्या

269
0

नवी दिल्लीः नवीन आरडीई नॉर्म्समुळे होंडाची कार महाग होणार आहे. भारतात होंडाची जास्त विकली जाणारी कारी अमेज होंडा आता महाग होणार आहे. कंपनी १ एप्रिल २०२३ पासून या कारच्या किंमतीत वाढ करणार आहे. खरं म्हणजे १ एप्रिल पासून कार्बन एमिशन नॉर्म्स लागू करण्यात येणार आहे. तसेच इनपूट खर्च वाढल्याने सेडानच्या कार खरेदी करणे महाग होणार आहे. कंपनीने यासंबंधी सांगितले की, अमेजच्या किंमतीत १२ हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन किंमत १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे. म्हणजेच तुम्हाला जर ही कार खरेदी करायची असेल तर ३१ मार्च पर्यंत ही कार १२ हजार रुपये स्वस्त मिळत आहे.
होंडा अमेजला भारतात २०१३ ला लाँच केले होते. तर याचे न्यू जनरेशन मॉडल २०२८ मध्ये भारतात लाँच केले होते. या दोन्ही मॉडल्सची २०२१ च्या अखेरपर्यंत भारतीय बाजारात ४.६ लाख यूनिट्सची विक्री झाली होती. न्यू जनरेशन होंडा अमेजने २ लाख यूनिटची विक्रीचा आकडा पार केला आहे. आता २०२२ मध्ये होंडा अमेजने ५ लाख यूनिट्सचा आकडा पार केला आहे. होंडा अमेजवर या महिन्यात ३ हजार रुपयाचा कॉर्पोरेट डिस्काउंट सोबत लॉयल्टी बोनस दिला जात आहे.
अमेजचे पॉवरट्रेन मध्ये १.२ लीटर आय व्हीटीईसी पेट्रोल इंजिन दिले आहे. जे ९० बीएचपी आणि ११० एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. एक १.५ लीटर आय डीटीईसी डिझेल इंजिन दिले आहे. जे १०० बीएचपीचे पॉवर आणि २०० एनएमचे टॉर्क जनरेट करते. अमेजमध्ये ट्रान्समिशन ऑप्शनसाठी एक मॅन्युअल गिअरबॉक्स आणि एक सीव्हीटी दरम्यान एक ऑप्शन मिळतो. अमेजला ई, एस, व्ही आणि व्हीएक्स सारख्या चार व्हेरियंट्स मध्ये खरेदी करता येवू शकते.
डिझाइन मध्ये यात एलईडी प्रोजेक्टर हेडलँम्प सोबत रिवाइज्ड फ्रंट बंपर, एक ट्विड फ्रंट ग्रिल आणि क्रोम सराउंड पाहायला मिळते. याशिवाय, लायटिंगसाठी या कारमध्ये एलईडी हेडलँम्प्स, फ्रंट फॉग लाइट आणइ सी शेप एलईडी टेललाइट सारखी सुविधा मिळते. ओआरव्हीएमसोबत १५ इंचाचा अलॉय व्हील्स आणि न्यू पेंट स्कीम मिळतो. याला पाच रंगात खरेदी करता येवू शकेत. याचे मायलेज २४.७ किमी प्रति लीटर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here