Home Uncategorized ICC एकदिवसीय विश्वचषक 2023च्या तारखा जाहीर!

ICC एकदिवसीय विश्वचषक 2023च्या तारखा जाहीर!

659
0

या वर्षाच्या अखेरीस I भारतीय भूमीवर होणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभाच्या तारखीबाबत एक मोठा खुलासा केला आहे . एवढेच नाही तर 2023 च्या वनडे वर्ल्ड कपचा अंतिम सामना कोणत्या दिवशी आणि कोणत्या मैदानावर होणार याचीही बरीच माहिती समोर आली याशिवाय 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे सामने कोणत्या शहरांमध्ये खेळवले जाणार हे ही माहित झाले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार या वर्षी भारतात होणारा 2023 विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार शक्यता आहे .2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या असल्याचे या अहवालात समोर आले आहे. एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत.

सर्व सामने भारतातील 12 शहरांमध्ये होतील . 2023 विश्वचषकाचे सामने हैदराबाद, कोलकाता, लखनऊ , इंदूर, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, गुवाहाटी, राजकोट आणि मुंबई येथे खेळणार. आता टीम इंडियाचे यंदाचे सर्वात मोठे लक्ष्य 2023च्या वनडे विश्वचषकावर नाव करायचे आहे. 12 वर्षांपूर्वी घरच्या मैदानावर खेळलेल्या 2011 विश्वचषकाचे विजेतेपद भारताने जिंकले होते. अशा परिस्थितीत यावेळी भारत 2023 विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. भारतात होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेला अजून 7 महिने बाकी आहेत.यावर्षी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल (लंडन) मैदानावर 7 जून ते 11 जून दरम्यान खेळल्या जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here