Home समाज भर उन्हाळ्यात सर्वसामान्यांना महागाईचे चटके; घरगुती गॅस सिलिंडरचे दरात ५० रुपयांची...

भर उन्हाळ्यात सर्वसामान्यांना महागाईचे चटके; घरगुती गॅस सिलिंडरचे दरात ५० रुपयांची वाढ

235
0

मार्च महिना सुरू होताच पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. मार्च महिना येताचा लोकांचा चिंता वाढटायला लागत. त्यामध्ये आता आणखी भर पडली आहेत.आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण, मार्च महिना सुरू होताच पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे.
१ मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आले आहे. याशिवाय १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही तब्बल ३५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आल्याने मुंबईत १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत आता १ हजार १०२ इतकी झाली आहे. बुधवारी सकाळपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाल्याने शहरातील लाखो ग्राहकांवर खर्चाचा बोजा वाढला आहे.
गेल्या चार महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या नव्हत्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारीमध्ये देशाचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर महागाईपासून दिलासा मिळेल अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र, गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने या आशेवर पाणी फेरले गेले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here