Home महाराष्ट्र खा.शरद पवार आणि प्रतिभाताई पवार वाढदिवसानिमित्त कळमनुरीत आरोग्य शिबिराचे आयोजन

खा.शरद पवार आणि प्रतिभाताई पवार वाढदिवसानिमित्त कळमनुरीत आरोग्य शिबिराचे आयोजन

770
0

१२डिसेंबर २०२० ते १२ जानेवारी २०२१पर्यंत चालणार शिबीर– गरिबांना होतोय फायदा

हिंगोली (कळमनुरी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खा शरदचंद्रजी पवार व प्रतीभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एनसीपी रूग्णसेवा हेल्पलाईन कळमनुरी चे नगरसेवक मोहम्मद नाजीम रजवी यांनी नांदेड येथील संजीवनी हॉस्पिटल मध्ये आयोजित केलेल्या शिबिरास गरीब रुग्णाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. डॉक्टर प्रल्हाद कोटकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे शिबिर १२ डिसेंबर २०२० ते १ २ जानेवारी २०२१पर्यंत चालणार आहे. डॉक्टर कल्याणकर सदरील रुग्णांची तपासणी करीत आहे.

मोफत अँन्जोप्लास्टी:
या शिबिरात अँन्जॉग्राफी तपासणी फक्त ३ हजार रुपये मध्ये करण्यात येणार आहे. अँन्जोग्राफी तपासनीत अँन्जोप्लास्टिक निघाल्यास ते तीन हजार रुपये रुग्णास परत देण्यात येईल. अँन्जोप्लास्टी मोफत मध्ये करण्यात येईल.

रुग्णांचा शिबिरास प्रतिसाद :
या शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या रुग्णाला बायपास सर्जरी लागल्यास कमलनयन बजाज हॉस्पिटलचे डॉक्टर महेश केदार सर्जरी करणार आहे. बजाज हॉस्पिटल तसेच दीपक हॉस्पिटल जालना इथे बायपास सर्जरी चे रुग्ण आपल्या नावाची नोदणी करून भर्ती होत आहे. या शिबिरात भर्ती झालेल्या आनेक रुग्णाची बायपास सर्जरी करण्यात आली आहे. बजाज हॉस्पिटल औरंगाबाद येथील डॉक्टर सचिन मुखेडकर हे औरंगाबाद येथील रुग्णाची अँन्जोप्लास्टी करणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त गरजु रुग्णांनी लाभ घिवा असे आहवान कलमनुरी चे नगरसेवक मो. नाजीम रजवी यानी केला आहे.

रुग्णांनी या क्रमांकावर संपर्क साधावा :
९४२१३८५४७२ -८४२१७०८१२५ -पद्माकर पाटील
९८३४०६९९७० -८३०८४१५४०१ महेश बिरादार

आवश्यक कागदपत्रे :

रुग्णांनी येताना पूर्वी तपासणी केलेले रिपोर्ट, राशेन कार्ड , आधार कार्ड आणि इलेक्शन कार्ड सोबत आणावे. अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here