Home इतर आता मिस कॉलनेच करता येणार सिलिंडर बुकिंग…!

आता मिस कॉलनेच करता येणार सिलिंडर बुकिंग…!

57
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : इंडियन गॅस ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. यानंतर एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंग करणे अगदी सोपे होणार आहे.कारण,इंडियन ऑईल चे एलपीजी ग्राहक आता फक्त मिस कॉलदेऊनच देशातील कोणत्याही भागात सिलिंडर बुक करू शकतात.याकरिता त्यांनी ८४५४९५५५५५ हा क्रमांक जारी केलेला आहे. या सुविधेमुळे एलपीजी गॅस बुक करणे अगदी सोपे होणार आहे.शुक्रवारी(१ जाने.)तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भुवनेश्वर येथून ही मिस कॉल सुविधा सुरू केली आहे.

दरम्यान,या सुविधेबाबत अधिक बोलतांना प्रधान म्हणाले की,लवकरच देशातील इतर शहरांमध्ये ते बाजारात आणले जाईल.शिवाय गॅस वितरणाची मुदत एका दिवसापासून काही तासांपर्यंत कमी केली जावी यासाठी त्यांनी गॅस एजन्सी आणि वितरकांना सांगितले.एलपीजीसंदर्भात देशाने बरेच अंतर कमी केेल आहे. २०१४ च्या अगोदर २ दशकांत २ कोटी लोकांजवळ एलपीजी कनेक्शन होते. आता गेल्या ६ वर्षात ती संख्या ३० कोटींवर गेली आहे.असेही प्रधान म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here