Home राजकीय इम्रान खान विरुद्ध अटक वॉरंट जारी

इम्रान खान विरुद्ध अटक वॉरंट जारी

206
0

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक जवळपास निश्चित मान्यात येत होती. भेटवस्तूंच्या लिलावात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी इम्रान अडचणीत आलेत. स्थानिक कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले असून कोणत्याही क्षणी इम्रान ला अटक होण्याची शक्यता होती. मात्र, हे वॉरंट अजामीनपात्र होते. कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश देऊनही वारंवार इम्रान यांनी हे आदेश धुडकावलेत. त्यामुळे हे अटक वॉरंट जारी झाले होते. त्यानंतर इम्रान यांनी इस्लामाबाद हायकोर्टात धाव घेतली. यानंतर कोर्टाने त्यांना मोठा दिलासा दिला आणि त्यांची होणारी अटक टळली आहे. त्यांच्या अटकेला कोर्टाने स्थगिती दिल्याची माहिती आहे.

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाने मंगळवारी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तोशाखाना प्रकरणात सत्र न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर काही तासांतच त्यांना अटक होण्याची शक्यता होती. भेटवस्तूंच्या लिलावात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी इम्रान अडचणीत आलेत. दिवसभरात इस्लामाबादमधील वेगवेगळ्या न्यायालयात सुनावणी होणार असलेल्या हत्येच्या प्रयत्नासह एका प्रकरणासह इम्रानला चार प्रकरणांमध्ये वैयक्तिकरित्या हजर राहणे आवश्यक होते. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे (पीएमएल-एन) खासदार मोशीन नवाझ रांझा यांनी इम्रानविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता.

गेल्या ऑक्टोबरमध्ये इस्लामाबादमधील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर हल्ला झाल्यानंतर, जेथे पीटीआय कार्यकर्ते आणि समर्थक तोशाखाना प्रकरणावरुन त्यांच्या पक्षाच्या प्रमुखाला संसदेतून अपात्र ठरवल्याबद्दल निषेध करत होते. त्यांना अपात्र ठरवण्याच्या निर्णयाविरोधात पीटीआय समर्थकांनी निवडणूक मंडळाच्या कार्यालयाबाहेर केलेल्या हिंसक आंदोलानंतर त्यांच्यावर दहशतवादाचा खटलाही दाखल करण्यात आला होता.

काही आठवड्यांपूर्वी इम्रान आणि इतर पीटीआय नेत्यांवर पक्षाला गैरमार्गाने निधी मिळाल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. तसेच इम्रान खान यांच्याविरोधात तीन खटल्यांमध्ये जामीन मिळाला असताना, सत्र न्यायालयाने तोशाखाना प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आणि सुनावणी 7 मार्चपर्यंत पुढे ढकलली. या झटक्यानंतर लगेचच इम्रान इस्लामाबाद उच्च न्यायालयात पोहोचला आणि त्यांना 7 मार्चपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर झाला. 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना बेल देण्यात आलेय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here