Home नागपूर अमिताभ बच्चन,मुकेश अंबानीं,धर्मेंद्रचे बंगले उडवून देण्याची धमकी

अमिताभ बच्चन,मुकेश अंबानीं,धर्मेंद्रचे बंगले उडवून देण्याची धमकी

305
0

नागपूर:महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता धर्मेंद्र आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे बंगले उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. नागपूर पोलिस
नियंत्रण कक्षाला मंगळवारी अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिलीआहे.पालघरच्या शिवाजीनगर भागातून हा फोन आल्याचे तपासात आढळून आले . ११२
हेल्पलाइन क्रमांकावर नागपूर शहरातील लक्कडगंज भागात असलेल्या नियंत्रण कक्षाला फोन आला होता. या सेलिब्रिटींचे बंगले बॉम्बस्फोटाने उडवून
देण्यासाठी २५ जण मुंबईत आल्याबद्दल दोन तरुण एकमेकांशी बोलत असल्याचे फोनवर पोलिसांना ऐकू आले. यानंतर मुंबई पोलिसांना सतर्कतेच्या सूचना
देण्यात आल्या असून तपास सुरू केला आहे.दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांना झेड प्लस ही सर्वोच्च सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने
दिले आहेत. देश आणि परदेशातही ही सुरक्षा प्रदान करण्यात यावी तसेच त्याचा खर्च अंबानी कुटुंबाला करावा लागेल, असेही न्या.कृष्ण मुरारी आणि न्या.
अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here