Home अकाेला प्रकाश आंबेडकर कडून भाजपला अप्रत्यक्ष मदत?

प्रकाश आंबेडकर कडून भाजपला अप्रत्यक्ष मदत?

543
0

नागपूर: प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीने चिंचवडच्या पोटनिवडणुकीत बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिला होता.या पाठिंब्यामुळे भाजपला जागा जिंकण्यासाठी एक प्रकारे मदतच केली.

थेट लढतीमुळे कसब्यात काँग्रेसने विजय मिळवला. तिरंगी लढतीमुळे चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला. या तिरंगी लढतीतील तिसरा उमेदवार हा सेनेचा बंडखोर होता आणि त्याला वंचित बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा होता. येथे मतविभाजनामुळे भाजपचा विजय सुकर झाला. त्यामुळे वंचितच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विदर्भात पश्चिम विदर्भ आणि मराठवाडय़ातील काही जिल्ह्यात वंचितचा प्रभाव आहे. एकीकडे भाजपविरोधी भूमिका घेतानाच दुसरीकडे जर-तर,अटी शर्तीची भाषा वापरून भाजप आमचा शत्रू नाही, असेही सांगायचे, अशी भूमिका या पक्षाचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची राहिली आहे. याचा प्रत्यय २०१४, २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत व त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही आला. या सर्व निवडणुकीत वंचितमुळे झालेल्या मतविभाजनाचा फायदा भाजपला व फटका काँग्रेस, राष्ट्रवादीला बसला होता.

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत नागपूर शिक्षक मतदारसंघातही वंचितने घेतलेली भूमिका अनाकलनीय होती. वंचितची शिवसेनेशी युती असताना व शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला असतानाही येथे वंचितने स्वंतत्र उमेदवार दिला होता. त्यानंतरही ही जागा काँग्रेसने जिंकली. कारण वंचितचा उमेदवार अपेक्षित मत विभाजन करू शकला नाही.

पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचा विजय हा तेथील संघटनात्मक पाठबळ, कार्यकर्ते तसेच दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी केलेली विकास कामे आणि मोदी, फडणवीस व बावनकुळे यांच्या नेतृत्वाचा विजय आहे. मतविभाजनामुळे यश मिळाले अशी टीका करणे म्हणजे लोकांनी दिलेला कौल अमान्य करणे होय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here