Home क्रीडा CSK ला प्ले ऑफमध्ये जाण्याची अद्यापही संधी, पण…

CSK ला प्ले ऑफमध्ये जाण्याची अद्यापही संधी, पण…

2
0

नवी दिल्ली । कॅप्टन कुल नावाने प्रसिद्ध असलेल्या महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super kings) या वर्षीच्या आयपीएलमध्ये एका पाठोपाठ एक अशा पराभवाचा सामना करावा लागून असून मोठी निराशा मिळाली आहे. काल मुंबई विरुद्ध प्रथम फलंदाजी CSK चा किल्ला पत्त्यासारखा कोसळला व त्यांना १० विकेटनी पराभव पत्कारावा लागला. गुणतक्त्यात सर्वात सीएसके शेवटच्या क्रमांकावर आहे, त्यांचे रनरेट देखील खराब आहे. तरीही धोनीच्या संघाला प्ले ऑफमध्ये जायची अद्यापही संधी असून यासाठी त्यांना ऐतिहासिक कामगिरी करत मोठा विजय मिळवावा लागेल. याबरोबरच त्यांचे भवितव्य अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. गुणतक्त्यावर नजर टाकल्यास चेन्नईला अद्याप संधी असल्याचे दिसते. चेन्नई जर ऐतिहासिक अशी कामगिरी केल्यास ते प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात. CSKने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत फक्त 3 सामान्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. केवळ 6 गुण आणि – 0.733 रनरेटसह ते अखेरच्या स्थानावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here