Home मनोरंजन सोनू सूद लिहितोय पुस्तक;पुस्तकाचं कव्हर पेज झाल व्हायरल

सोनू सूद लिहितोय पुस्तक;पुस्तकाचं कव्हर पेज झाल व्हायरल

1226
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सोनू सूदचे एक नवीन पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहे. ‘आय एम नॉट मसिहा’ म्हणजेच ‘मी तारणहार नाही‘ असे या पुस्तकाचे नाव आहे. डिसेंबर महिन्यात हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. कोरोनाकाळात लोकांची मदत करताना आलेले अनुभव तो या पुस्तकातून सांगणार आहे. हे पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीला प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास सोनू सूदने व्यक्त केला आहे. या पुस्तकाचे कव्हर पेज त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.

सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवले आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. महत्वाचे म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हंटले होते.आनंदाची गोष्ट म्हणजे या वाक्याचे तो पालनही करत आहे.

https://www.instagram.com/p/CHes3xFA_7Q/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here