Home वाहतूक दराबाद महामार्ग सर्व्हिस रस्त्यावर‎ सर्रास ट्रक पार्किंग

दराबाद महामार्ग सर्व्हिस रस्त्यावर‎ सर्रास ट्रक पार्किंग

228
0

साेलापूर:सोलापूर हैदराबाद महामार्गाचे काम‎ तीन वर्षे रखडले होते. आता कुठे‎ सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्णत्वाला‎ जात आहे. दुचाकी, तीन चाकी,‎ चार चाकी, बस आदी वाहनांसाठी‎ सर्व्हिस रस्ता असतो, परंतु येथे‎ वेगळेच पाहायला मिळत आहे.‎ ट्रान्सपोटवाल्यांनी या सर्व्हिस‎ रस्त्याचा वापर ट्रक पार्किंगसाठी‎ सुरू केल्याने रहदारीस अडथळा‎ होत आहे.‎ मार्केट यार्डासमोरील शिवदारे‎ मंगल कार्यालयापर्यंत‎ हैदराबाद-सोलापूर महामार्गाची‎ सीमा आहे. येथपर्यंत सर्व्हिस‎ रस्त्याचे काम होत आले आहे. रस्ता‎ दुभाजकाचे काम होत आहे.
सर्व्हिस‎ रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत‎ राष्ट्रीय महामार्ग वाहतूक शाखा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आणि शहर पोलिस वाहतूक शाखेने‎ हा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.‎ अन्यथा वाहतुकीची कोंडी होऊन‎ अपघात निमंत्रण दिल्यासारखे‎ होईल.‎ शिवदारे मंगल कार्यालयापर्यंत‎ महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात‎ आले आहे. येथून मार्केट यार्डपर्यंत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ २०० मीटर अंतर असून रस्ता‎ करण्यासाठी महापालिकेने पाच‎ वर्षापूर्वी अतिक्रमण काढले होते.‎ आजपर्यंत येथे रस्त्याचे काम झाले‎ नाही. हे काम राष्ट्रीय महामार्ग‎ प्राधिकरणाच्या माध्यमातूनच होणार‎ आहे. त्यामुळे प्राधिकरणाने हे‎ कामही लवकर करणे गरजेचे आहे.‎

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here