Home इतर हॉटेलमध्ये जेवायला गेला अन…!

हॉटेलमध्ये जेवायला गेला अन…!

365
0

मराठवाडा साथी न्यूज

सांगली : आजच्या स्थितीत कधी काय होईल सांगता येत नाही.हॉटेलमध्ये मित्रासोबत जेवायला गेल्यानंतर वाद झाल्यामुळे चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना मिरजमध्ये घडली आहे.सोमवारी(११ जाने.)रात्री हा प्रकार घडला.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव मुन्ना शेख उर्फ मांगलेकर(वय ४२)असून ते मित्रांसोबत मिरजेतील मराठे मिल रोडवरील सॅन शाईन हॉटेलमध्ये जेवायला गेला होते.जेवण करत असतांना मुन्ना यांचे तेथील एका अज्ञात व्यक्तीसोबत वाद झाला.हा वाद एव्हढा वाढला की,रागाच्या भरात या अज्ञाताने मुन्ना वर चाकूने हल्ला केला.ही घटना घडताच हॉटेलचे कर्मचारी आणि इतरांनी जखमी मुन्नाला उपचारासाठी मिरजेतील खाजगी रुग्णालयात दाखल केले.मात्र,उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे मिरजमधील खासगी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, हॉटेलमधील हत्येचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here