Home अंबाजोगाई अल्पवयीन मुलीचा लावला विवाह, मुलगी सासरी राहत नसल्याने वडिलांनीच अज्ञात ठिकाणी दिले...

अल्पवयीन मुलीचा लावला विवाह, मुलगी सासरी राहत नसल्याने वडिलांनीच अज्ञात ठिकाणी दिले सोडून

938
0

बीड : बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीत शिक्षण घरत असलेल्या अल्पवयीन मुलीचे इच्छे विरुद्ध लग्न लावून दिले . यानंतर मुलीने सासरी नांदण्यास नकार दिल्याने माहेरच्या मंडळीनी अज्ञात स्थळी सोडून गेल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील या घटनेचे सत्य समोर आले आहे . या बालविवाह प्रकरणी मुलीचे आई-वडील, आजोबा, मामा, सासू, सासरा, पती यांच्यासह सात जणांवर युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई तालुक्यातील दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह ( दि. 16) फेब्रुवारी पार पडला. या बालविवाहात काही अडचण येऊ नये म्हणून मुलगीला अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात देण्यात आलं. तर विवाह केज तालुक्यातील मामाच्या गावी शेतात लावून देण्यात आला. दरम्यान त्या मुलीने सासरच्या मंडळींला मला विवाह मान्य नाही. मी येथे रहाणार नाह, असे सांगितले . त्यांनी ही माहिती माहेरी दिली. माहिती मिळताच वडील, आजोबा आणि मामांनी औरंगाबाद गाठून अल्पवयीन वधूला एका वाहनात बसवून‌ अज्ञात स्थळी सोडून दिले. एका महिलेला हा प्रकार मुलीने सांगितला असता तिने मदत करत मुलीला पोलीस ठाण्यात सोडले. सदरील अल्पवयीन वधूने पोलिसांना हकीकत सांगितली असता दौलताबाद जिल्हा संभाजीनगर पोलीसांनी माहिती युसुफ वडगाव पोलीसांना दिली. येथे आई-वडील , आजोबा, मामा, पती, सासु ,सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here