Home अंबाजोगाई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हेळंब येथील खंडोबा देवाचा व्यापक यात्रा उत्सव रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हेळंब येथील खंडोबा देवाचा व्यापक यात्रा उत्सव रद्द

535
0

अंबाजोगाई
हेळंब येथे दरवर्षी ग्रामदैवत श्री खंडोबा देवाची चंपाषष्टी निमीत्त यात्रा ही मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते.या निमीत्त तीन दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजीत करण्यात येतात.परंतू,यावर्षी माञ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत श्री खंडोबा देवाचा चंपाषष्टीनिमीत्त होणारा यात्रा महोत्सव आणि त्या निमीत्ताने आयोजित असलेले व्यापक कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे समस्त हेळंब ग्रामस्थ,ग्रामपंचायत पदाधिकारी व देवल कमिटी यांनी कळविले आहे.

यावर्षी ही यात्रा दि.२० डिसेंबर रोजी येत असुन यात्रेनिमित्त दरवर्षी तीन दिवसीय याञा उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम आयोजीत करण्यात येतात.यासाठी पंचक्रोशी आणि तालुक्यातून हजारो भाविक,भक्तजन दर्शनासाठी हेळंब येथे दाखल होतात.दर्शन घेतात.यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाच्या सूचनेवरून ग्रामदैवत श्री खंडोबा देवाचा चंपाषष्टीनिमीत्त होणारा यात्रा महोत्सव आणि त्यानिमीत्ताने आयोजित असलेले व्यापक कार्यक्रम रद्द करण्यात आले असुन केवळ पाच 

मानक-यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा करण्याचा निर्णय समस्त हेळंब (ता.परळी) ग्रामस्थांनी, ग्रामपंचायत पदाधिकारी व देवल कमिटीचे वतीने घेतला आहे.हेळंब येथुन जवळच असलेल्या बोरणा नदीकाठी बोरणाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले श्री.खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे.स्वतः खंडोबा हे हेळंब येथे वास्तव्याला होते.त्याचा पुरावा म्हणुन स्नानासाठी वापरण्यात येते असलेल्या तीर्थ कुंड आजही उपलब्ध आहे.घोडा बांधण्यासाठी खुट उपलब्ध आहे.व त्याच्या खुणा आजतागयत ही अबाधित आहेत.श्री खंडोबा मंदिराची दुर दुर ख्याती आहे. दरवर्षी चंपाषष्ठीला इथे मोठी यात्रा भरते.हजारो भाविक दर्शन घेतात. यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा व अनेक प्रकारची दुकाने येतात.यावर्षी कोरोनामुळे यात्रेतील कार्यक्रम रद्द करावेत अशा सुचना प्रशासनाने दिल्यानंतर हेळंब ग्रामस्थांनी एकमुखाने निर्णय घेत फक्त पालखी मिरवणूक सोहळा हा केवळ पाच मानक-यांच्या उपस्थितीत घेण्याचे व श्री खंडोबाचे दर्शन शासननिर्देश व सर्व नियम पाळून करण्याचा निर्णय घेतल्याने हेळंब येथील खंडोबा यात्रा साधेपणाने होणार आहे.नित्य नियमाप्रमाणे होणारी पुजा ही पुजारी व गावातील एका भक्ताने करावी व इतर भाविक भक्तांनी तोंडाला मास्क बांधून, सुरक्षित अंतर ठेवून, सॅनिटायझरचा वापर करून दर्शन घ्यावे,मंदीर व परीसरात गर्दी करू नये.तसेच सर्व भाविक भक्तांनी ग्रामदैवत श्री खंडोबा मंदिर देवल कमिटीस सहकार्य करावे असे आवाहन ग्रामदैवत श्री खंडोबा देवाचे निस्सीम भक्त प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here