Home आरोग्य आश्चर्यकारक!औरंगाबामधील एका व्यक्तीने गिळला ‘ब्रश’…!

आश्चर्यकारक!औरंगाबामधील एका व्यक्तीने गिळला ‘ब्रश’…!

109
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : लहान मुलांनी पैसे किंवा लहान वस्तू गिळल्याचे आपण खूपदा ऐकले असेल. मात्र,औरंगाबादमधील एका व्यक्तीने चक्क टूथब्रश गिळल्याची घटना समोर आली आहे.पोटदुखीचा त्रास झाला म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या ३३ वर्षीय व्यक्तीची तपासणी केली असता डॉक्टरही थक्क झाले.कारण,या रुग्णाने चक्क टूथब्रश गिळला होता.

टूथब्रश गिळल्यानंतर रुग्णाचे पोट फारदुखू लागले.यामुळे त्याने औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी सिटीस्कॅन केले असता त्याच्या पोटात टूथब्रश असल्याचे पहायला मिळाले. हा ब्रशची लांबी जवळपास अर्धा फूट होती.त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णावर त्वरित सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.जवळपास दीड तासाच्या सर्जरी नंतर यशस्वीपणे हा ब्रश बाहेर काढण्यात आला.

दरम्यान,अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यचिकित्सा पथक क्रमांक-६ चे प्रमुख जुनेद एम. शेख, डॉ. अविनाश घाटगे, डॉ. ओमर खान, डॉ. संदीप चव्हाण, डॉ.सुकन्या विंचूरकर, डॉ.गौरवभावसार, भुलतज्ज्ञ डॉ. अनिकेत राखूडे,डॉ. विशाखा वाळके, अधिपरिचारिका संतोशी सोनगट्टी यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here