Home क्रीडा क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ! वनडे वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ! वनडे वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या

608
0

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचा शेवटचा सामना होण्यापूर्वीच आता क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या असून ईएसपीएन क्रिकइन्फोने याबाबत अहवाल जाहीर केला आहे. यात वनडे वर्ल्ड कपच्या सुरुवातीपासून ते अंतिम सामन्यापर्यंतच्या अनेक गोष्टींविषयी माहिती देण्यात आली आहे.भारताच्या धर्तीवर यंदा खेळवण्यात येणाऱ्या वनडे वर्ल्ड कपला ५ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. ५ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या दरम्यान वनडे वर्ल्ड कपमध्ये तब्बल ४८ सामने खेळवले जाणार असून यात तीन बाद फेऱ्या पारपडतील. भारतातील १२ शहरांमध्ये हे सामने खेळवले जाणार असून यात मुंबई सह हैदराबाद, कोलकाता, लखनौ, इंदूर, दिल्ली, लखनौ, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, गुवाहाटी, राजकोट या शहरांचा समावेश आहे. तसेच वनडे वर्ल्ड कपचा शेवटचा सामना हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येईल.भारताने २०११ रोजी महेंद्र सिंह धोनी याच्या भारताला पहिला वनडे वर्ल्ड कप जिंकून दिला होता. परंतु यानंतर अनेकदा सेमी फायनल पर्यंत धडक देऊनही भारतीय संघ पुन्हा वनडे वर्ल्ड कपवर नाव करू शकला नाही. तेव्हा यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2023 चा वनडे वर्ल्ड कप जिंकण्याच लक्ष भारतीय संघाचं असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here