Home क्राइम चाकूचा धाक दाखवून शेतकऱ्याचे ५० हजार लुटले

चाकूचा धाक दाखवून शेतकऱ्याचे ५० हजार लुटले

980
0

वसमत येथील रिलायन्स पेट्रोलपंपा जवळ घडली घटना

वसमत : नांदेड महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ चाकूचा धाक दाखवून एका ६५ वर्षीय शेतकऱ्या जवळील ५० हजार रुपये लुटल्याची घटना २२ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनुसार रांजोना येथील ६५ वर्षीय दादाराव राजाराम साळवे या शेतकऱ्याचा नांदेड रोड वरील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ अज्ञात चोरटयांनी तोंड दाबुन चाकूचा धाक दाखवत त्यांच्या कडील ५० हजार रुपये लुटल्याची घटना येथे घडली.

हि घटना २२ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडल्याची फिर्याद साळवे यांनी २३ जानेवारी रोजी शहर पोलीस स्थानकात दिली. दरम्यान याचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बर्गे करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here