Home आरोग्य ह्रदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योग्य सवयी

ह्रदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योग्य सवयी

281
0

दगदगीच्या जीवनात स्वतः ला वेळ देणे कठीण झाले आहे. त्यामुळे आपण अनेक आजाराना आमंत्रित करत असतो मानसिक ताणतणावामुळे आपल्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आपल्या ह्रदयाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. ह्रदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपल्या रोजच्या आयुष्यात काहीसवयीचा समावेश करणे गरजेचे आहे. दररोज व्यायाम करणे,धूम्रपान करणे सोडणे किंवा तुमच्या आयुष्यातील तणावाची पातळी कमी करण्यासाठी पावले उचलू शकता या सर्व गोष्टींचा हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण, तुमच्या हृदयाला फायदा होईल अशा सोप्या जीवनशैलीतील बदलांपैकी एक म्हणजे तुम्ही काय खाता ते पाहणे.जवळपास6 दशलक्ष लोक सध्या हृदयविकारा या आजाराने त्रस्त आहेत , आणि यापैकी निम्मे लोक निदान झाल्यानंतर 5 वर्षांच्या आत मृत्यू झाल्याचा रिपोर्ट देखील आहे.आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. बीन्स, वाटाणे, चणे आणि मसूर, शतावरी चिया बियाणे आणि फ्लेक्ससीड्स,डार्क चॉकलेट अशा प्रकारच्या अन्नाचा जास्तीत जास्त आहार घेणे गरजेचे आहे या मुळे ह्रदय निरोगी व स्वस्थ राहते व ह्रदयविकाराच्या झटक्याची संभावणा कमी होते.म्हणून रोजच्या आहारात पौष्टिक अन्नाचा समावेश करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here