Home पुणे क्रेडिट कार्ड काढून देतो म्हणत महिलेची फसवणूक, तरुणीने खरेदी केले ६ आयफोन

क्रेडिट कार्ड काढून देतो म्हणत महिलेची फसवणूक, तरुणीने खरेदी केले ६ आयफोन

575
0

पुणे: सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांची फसवणूक करता. त्यात काही क्षणात लाखोंची फसवणूक केली जाते. आता पुण्यात एका महिलेला क्रेडीट कार्ड काढून देतो असं सांगत एका भामट्या तरुणीने तब्बल ३ लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.महिलेकडून कार्डची गोपनीय माहिती घेत परस्पर सहा आय़फोन खरेदी केले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधित तरुणीवर दत्तवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक्षा अविनाश चौरे असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचं नाव आहे. याप्रकरणी संगिता हनुमंत गायकवाड यांनी पोलिसात तक्रार दाखल केलीय. सप्टेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२१ या काळात हा प्रकार घडला.

प्रतिश्राने संगिता यांना आयडीएफसी बँकेचं क्रेडिट कार्ड काढून देते असं सांगितलं होतं. त्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल असं सांगून तो घेतला. त्यांच्या खात्यातून वेळोवेळी २ लाख ७० हजार रुपये किंमतीचे आयफोन लोन घेतले. तक्रारदार महिलेच्या नावे तरुणीने परस्पर ही खरेदी केली. तर महिलेच्या मित्राच्या नावावरही दोन आयफोन घेतले. असे एकूण ३ लाख ९१ हजार रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here