Home मनोरंजन सोनाक्षी सिन्हाचा ” तो ” व्हिडीओ झाला व्हायरल

सोनाक्षी सिन्हाचा ” तो ” व्हिडीओ झाला व्हायरल

526
0

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा दबंग गर्ल, बुलेट क्वीन म्हणूनही ओळखली जाते. अनेकदा सोनाक्षी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर लाईव्हही येते. ती अनेक विषयांवर चाहत्यांशी लाईव्ह गप्पा मारते. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर नेपोटिझम विषयी मोठी चर्चा उफाळली होती. त्यात सोनाक्षीने केलेल्या वक्तव्यामुळे नेटिझन्सकडून तिच्यावर मोठी टिका करण्यात आली होती. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून तिच्यावर टिका होत होती. त्यावेळी सोनाक्षीने तिचं ट्विटर अकाउंटही डिलीट केलं होतं. मानसिकदृष्ट्या त्रास टाळण्यासाठी तिने हे पाऊल उचचलं होतं. मात्र त्यानंतर आता सोनाक्षीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सोनाक्षीने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती एका मागून एक कपडे बदलून येताना दिसतेय. तिचा हा व्हिडीओ एका फोटोशूटमधला असल्याचं बोललं जात आहे. हा मजेशीर व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CKV4vrOpF_L/?utm_source=ig_web_button_share_sheet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here