Home छत्रपती संभाजी नगर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा गृहमंत्री अमित शहावर आरोप;शहा सॅटेलाइटच्या माध्यमातून ईव्हीएम...

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा गृहमंत्री अमित शहावर आरोप;शहा सॅटेलाइटच्या माध्यमातून ईव्हीएम हॅक करतात

420
0

गडचिरोली:भाजपला देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत. गृहमंत्री अमित शहा हे सॅटेलाइट नियंत्रित करून भाजपसाठी ईव्हीएम हॅक करतात. त्यांनी या कामासाठी माणसे ठेवली असून त्यातीलच एकाने मला ही गोपनीय माहिती दिली आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते शिवगर्जना अभियानाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत होते.खैरे म्हणाले की, इतर प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठी भाजप ईडी, सीबीआय, आयकर विभाग, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यांसारख्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर करत आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव देण्याच्या निर्णयाबाबत खैरे म्हणाले, निवडणूक आयोगाने केंद्राच्या दबावात येऊन काम केले आहे. ईव्हीएमला आमचा विरोध आहे. यापुढील सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवरच करण्यात याव्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here