Home क्राइम फरदीन खान आणि ड्रग्स प्रकरण

फरदीन खान आणि ड्रग्स प्रकरण

272
0

मुंबई : बॉलिवूडमधील काही पिता-पुत्रांच्या जोड्या हिट तर काही फ्लॉप ठरल्या. प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट निर्माते फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान हा फ्लॉप स्टारकिड्सपैकी एक आहे. फरदीनने १९९८ मध्ये ‘प्रेम अगन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेल्या फरदीनकडून लोकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या होत्या. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत फरदीनसुद्धा बॉलिवूडचा आगामी सुपरस्टार बनेल असं अनेकांना वाटत होतं. मात्र फरदीनचे बहुतांशी सिनेमे फ्लॉफ ठरल्या. त्यामुळे हुळहुळू अभिनेता लाइमलाईटपासून दूर गेला होता. मात्र सध्या फरदीन कुठे आहे? असा अनेकांना प्रश्न पडतो.

फरदीन खानचा जन्म ८ मार्च १९७४ रोजी झाला होता.फरदीनने शिक्षण पूर्ण केल्यानंतर चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. फिरोज खान यांनी आपल्या मुलाचा पहिला चित्रपट ‘प्रेम अगन’ बनवला होता. या चित्रपटानंतर फरदीनच्या चित्रपटांना फारसं यश मिळालं नाही. ज्या चित्रपटाने फरदीन खानला चित्रपटसृष्टीत ओळख मिळवून दिली तो म्हणजे राम गोपाल वर्माचा चित्रपट ‘जंगल’ हा चित्रपट होय.फरदीन खानचा ‘जंगल’ हा सिनेमा २००० साली प्रदर्शित झाला होता. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘जंगल’ चित्रपटाला चांगलीच पसंती मिळाली होती. या चित्रपटात फरदीनने गंभीर भूमिका साकारली होती.फरदीनच्या अभियानचं प्रचंड कौतुक झालं होतं. आजही फरदीन खानला या सिनेमामुळे ओळखलं जातं. विशेष म्हणजे या चित्रपटाने त्या काळात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

परंतु काही चित्रपट फ्लॉफ झाल्यामुळे फरद कोकेनचं सेवन आणि अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी या अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी त्याला फरदीन रिहॅब सेंटरमध्ये दाखल केलं होतं. यादरम्यान फरदीनचं वजनही अफाट वाढलं होतं. परंतु गेल्या वर्षी फरदीनचा एक फोटो समोर आला होता ज्यात त्याने आपल्या ट्रान्सफॉर्मेशनने सगळ्यांना चकित केलं होतं.

फरदीन खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, तो ज्येष्ठ अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा आहे. शिवाय त्याने ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांची मुलगी नताशा माधवानीशी लग्न केलं आहे. फरदीन आणि नताशा यांना दोन मुले आहेत. फरदीन हा व्यवसाय करतो आणि त्याच्याकडे करोडो रुपयांची मालमत्ता आहे. बऱ्याच दिवसांपासून अशा बातम्या येत आहेत की फरदीन लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here