Home मनोरंजन क्रिती सेनॉनने केला तिच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा म्हणाली.. मी प्रेमात.

क्रिती सेनॉनने केला तिच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा म्हणाली.. मी प्रेमात.

235
0

क्रिती सेनॉन तिच्या अप्रतिम अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या तिच्या चित्रपटांसोबतच, क्रिती तिच्या लव्ह लाईफमुळे खूप चर्चेत आहे.दरम्यान, क्रितीने तिच्या लव्ह लाईफबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. प्रेमात ती आंधळी होऊन जाते असे क्रितीने सांगितले आहे. याशिवाय क्रितीनेही तिच्या भूतकाळाबद्दल खुलासा केला आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत क्रितीला तिच्या लव्ह लाईफबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ज्याला क्रितीने खुलेपणाने उत्तर दिले आहे. क्रिती म्हणाली की- ‘असे होऊ शकते की मी खूप व्यस्त आहे आणि म्हणूनच कदाचित माझ्या आयुष्यात कोणी नाही, मी अद्याप कोणालाही भेटले नाही.आता जरी माझ्या आयुष्यात कोणी नसले तरीही असे नाही की, अगोदर कोणी नव्हते. कदाचित आता खूप काम करण्याची वेळ आहे आणि माझ्या भोवती मला हवी तशी योग्य व्यक्ती नसावी. क्रिती म्हणाली, मला वाटते की, प्रेमामध्ये मी बऱ्याच वेळा खूप जास्त आंधळी होते’.याशिवाय क्रितीने भूतकाळातील रिलेशनशिपबद्दलही सांगितले आहे की- ‘मला वाटते की मी प्रेमात थोडी आंधळी होते . मी समोरच्या व्यक्तीवर खूप विश्वास ठेवायला लागते.मात्र, आता मी थोडी सर्तक झालीये.मी अगोदर समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे जाणून घेईल मग हळूहळू त्याच्यावर विश्वास करेल. माझ्या मते, कोणतेही नाते विश्वासाशिवाय चालत नाही आणि कोणीतरी म्हटले आहे की प्रेम आंधळे असते.याआधी क्रितीचे नाव साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार प्रभासला डेट करण्यासाठी चर्चेत आले आहे. मात्र, क्रितीने प्रभाससोबतच्या तिच्या नात्याच्या बातम्यांना केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.याशिवाय या दोन्ही स्टार्सकडून रिलेशनशिपबद्दल कधीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. क्रिती सेनॉन आगामी काळात ‘आदिपुरुष’ आणि ‘गणपत’ या चित्रपटात दिसणार असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here