Home क्राइम भारती,हर्षच्या जामीन अर्जावरील सुनावणी टळली

भारती,हर्षच्या जामीन अर्जावरील सुनावणी टळली

189
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांच्या घरातून ८६.५ ग्रॅम गांजा सापडल्यानंतर दोघांनाही प्रथम एनसीबीने ताब्यात घेतले होते.चौकशीनंतर भारती ला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर १८ तासांच्या चौकशीनंतर हर्ष लिंबाचिया यालाही अटक करण्यात आली. काल दोघांनाही मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांनाही मुंबईच्या किल्ला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

त्यानंतर दोघांनीही जामीनासाठी अर्ज केला.आज दोघांच्याही जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. परंतु, सरकारी वकील अतुल सरपांडे सेशन कोर्टाच्या दोन वेगवेगळ्या सुनावण्यांमध्ये व्यस्त होते. ज्यामुळे ते एनसीबीची बाजू मांडू शकणार नाहीत. त्यामुळे एनसीबीच्या अधिकारी कोर्टाकडे भारती आणि हर्षच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी करण्याची विनंती केली होती. त्यामुळे दोघांच्याही जामीन अर्जावरील आजची सुनावणी टळली असून भारती आणि तिचा पतीन हर्षला आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार आहे. उद्या याप्रकरणाची सुनावणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली असून दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती पासून दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, अर्जुन रामपाल, त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांच्यासह अनेक जणांची नावे समोर आली असून त्यांची चौकशीही करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here