Home मुंबई मसाल्यांचे बादशाह आणि MDH चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन…!

मसाल्यांचे बादशाह आणि MDH चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन…!

621
0

मराठवाडा साथी न्यूज

कुटुंब चालवण्यासाठी ‘टांगाचालक’ म्हणून देखील केले होते काम

मुंबई : ‘महाशिया दी हट्टी’ (MDH) चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले आहे. पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर धर्मपाल यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली आणि गुरुवारी(३ डिसें.)सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.

महाशय धर्मपाल गुलाटी यांच्याविषयी थोडक्यात

धर्मपाल गुलाटी MDH चे मालक असून अनेकदा त्यांचे फोटो आपण MDH मसाल्यांच्या पाकिटावरही पाहिले आहेत. त्याच्या वडिलांनी सध्या पाकिस्तान म्हणजेच त्यावेळचे ‘सियालकोट’ येथे १९१९ साली पहिल्यांदा मसाल्यांचा एक छोटा व्यवसाय सुरू केला होता. फाळणीनंतर गुलाटी कुटुंबीय दिल्लीला आले.सुरुवातीला त्यांनी कुटुंब चालवण्यासाठी टांगाचालक म्हणून देखील काम केलं होतं. थोडे पैसे जमल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी लाकडाच्या लहान पेटीतून मसाले विकण्यास सुरुवात केली आणि हा व्यवसाय पुढे वाढवत नेला.

व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी भारत सरकारने त्यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषणने सन्मान केला आहे. मागील वर्षी प्रजासत्ताक दिनी महाशय धर्मपाल गुलाटी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.ते आपल्या ,मसाल्यांची जाहिरात स्वतःच करायचे.यूरोमॉनिटरच्या माहितीनुसार धर्मपाल गुलाटी एफएमसीजी (फास्ट मूविंग कन्झ्युमर गुड्स) क्षेत्रात सर्वात कमाई करणारे सीईओ होते.

सद्यस्थितीला MDH मसाले भारतातील सर्वात प्रसिद्ध मसाल्यांपैकी एक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here