Home मनोरंजन निक -प्रियांकाची सेकंड “Wedding Anniversary “

निक -प्रियांकाची सेकंड “Wedding Anniversary “

461
0

मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या लग्नाला या वर्षी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त या दोघांनीही एकमेकांना अगदी वेगळ्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत. 1 डिसेंबर रोजी हिंदू पद्धतीने तर 2 डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने त्यांचं लग्न झालं होतं. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एकमेकांना खास संदेश लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांना चाहत्यांनीही सोशल मीडियावर उदंड शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर प्रियांकाने ते दोघे हातात हात घालून रस्त्याच्या कडेनं चालत आहेत, असा एक जुना फोटो शेअर केला आहे. त्यावर तिने लिहिले आहे, ‘लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन. नेहमी माझी साथ दिल्याबद्दल आभार. तू माझी ताकद आहेस, कमजोरी आहेस, सर्वस्व आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करते.’

निक जोनासनेही इन्स्टाग्रामवर त्या दोघांच्या लग्नाचा एक खास फोटो शेअर केला असून, त्यावर एक सुंदर संदेश लिहिला आहे. तो म्हणतो, ‘सर्वांत सुंदर, प्रेरणादायी व्यक्तीबरोबर झालेल्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रियांका, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आय लव्ह यू !

राजस्थानमधील जोधपूर इथं उमेद भवन या राजेशाही हॉटेलात तीन दिवस त्यांचा शाही विवाह सोहळा सुरू होता.प्रियांका -निकचे जगभरात लाखो चाहते आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

https://www.instagram.com/p/CIQINHljSHh/?utm_source=ig_web_button_share_sheet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here