Home इतर आता जगावर नव्या विषाणूचा धोका…!

आता जगावर नव्या विषाणूचा धोका…!

519
0

मराठवाडा साथी न्यूज

न्यूयॉर्क : सध्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगात घातलेला धुमाकूळ थांबवण्याचे नाव घेत नसताना आता सर्वांसमोर अजून एका धोकादायक विषाणूचे संकट उभे राहिले आहे. तसेच या विषाणूचा फैलाव हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत असल्याचे पुरावेही मिळाले आहेत. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिजीस कंट्रोल (सीडीसी) ने याला दुजोरा दिला आहे. ‘चापरे विषाणू’ असे या विषाणूचे नाव असून, दरम्यान या विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या आजाराची लक्षणे डेंग्यू आणि इबोलासारखी असल्याचे समोर आले आहे.

जगात पुन्हा कोरोनासारखी लक्षावधी लोकांना संक्रमित करणारी साथ येण्यापासून रोखण्यासाठी शास्त्रज्ञांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सुरू असलेल्या संशोधनादरम्यान या विषाणूचा शोध लागला आहे. तज्ज्ञांच्या मते बोलिव्हियाची राजधानी ला पाज येथील डी फॅक्टो रुग्णालयातील दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना २०१९ मध्ये चापरे विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.

अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने या दुर्मीळ विषाणूचा शोध बोलिव्हियामध्ये लावला आहे. बोलिव्हियामध्ये या विषाणूच्या संसर्गाचे काही रुग्ण सापडले आहेत.चापरे विषाणूच्या संसर्गामुळे असा ताप येतो की ज्यामुळे ब्रेन हॅमरेजसुद्धा होऊ शकते. हा विषाणू काही प्रमाणात इबोलाप्रमाणेच आहे.

सध्या या विषाणूला चापरे विषाणू असे नाव देण्यात आले आहे. या विषाणूबाबत सोमवारी रात्री अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन आणि हायजिनच्या वार्षिक बैठकीत सांगण्यात आले. हा विषाणू माणसांमधून माणसांमध्ये परसत असल्याने तो साथीचे कारण ठरू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

अशी आहेत लक्षणे

कोसाबूम यांनी सांगितले की, ज्या रुग्णांना या विषाणूचा संसर्ग झाला होता त्यांना ताप, पोटदुखी, उलटी, हरड्यांमधून रक्त येणे, त्वचेवर ओरखडे उठणे आणि डोळ्यांमध्ये वेदना होणे, अशी लक्षणे दिसून आले. सध्या या विषाणूच्या संसर्गावर कुठलाही इलाज उपलब्ध नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here