Home मुंबई कारखाना उद्ध्वस्त…!

कारखाना उद्ध्वस्त…!

217
0

मराठवाडा साथी न्यूज
मुंबई :
कुख्यात माफिया दाऊद इब्राहीम याचे प्रभावक्षेत्र म्हणून एकेकाळी ओळखला जाणारा डोंगरी परिसर आता अमली पदार्थांचा बालेकिल्ला बनू लागला आहे. येथील एका निवासी संकुलातील कारखाना उद्ध्वस्त करत अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी)केंद्रीय पथकाने कोट्यवधी रुपयांचे ‘एमडी’ आणि ते बनवण्यासाठी आवश्यक रसायनांचा साठा जप्त केला. कारवाईदरम्यान दोन कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड आणि अद्ययावत शस्त्रसाठाही पथकाने हस्तगत केला आहे. या कारखान्यात अमली पदार्थ तयार करून विकणारे दोन आरोपी, त्यांचे साथीदार दाऊद इब्राहिम व कुख्यात तस्कर करिम लाला यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे अमली पदार्थ उत्पादन, विक्रीत गुंतलेल्या या संपूर्ण टोळीस जेरबंद करण्यासाठी दक्षिण मुंबईवर लक्ष केंद्रित के ल्याची माहिती एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
दक्षिण मुंबईत पाब्लो एस्कोबार(कोलंबियातील ड्रग माफिया) या नावाने ओळख असलेल्या परवेझ खान ऊर्फ चिंकू पठाण याला एनसीबीने घणसोली येथून अटक के ली. घणसोली येथील चिंकू च्या घरातून अद्ययावत पिस्तूल आणि अमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला. चौकशीदरम्यान त्याने आपला साथीदार आरिफ भुजवाला याचे नाव घेतले. भुजवाला डोंगरी येथील नूर मंझिल इमारतीतील भुजवाला याच्या आलिशान घरात एनसीबीने बुधवारी रात्री छापा घातला. या इमारतीतील एनसीबीची शोधमोहीम गुरुवारी सकाळी पूर्ण झाली. शोधमोहिमेत भुजवाला याच्या घरातूनही अद्ययावत पिस्तूल आणि दोन कोटी १८ लाख रुपयांची बेहिशोबी रोकड आढळली. तसेच या इमारतीत भुजवाला याने एमडी निर्मितीसाठी चिंकू व अन्य साथीदारांच्या मदतीने सुरू के लेल्या गुप्त कारखान्याची माहिती हाती लागली. या कारखान्यात सुमारे सहा किलो तयार एमडी, एक किलो मॅथाएम्फे टामाइन आणि सहा किलो एफिड्रीनचा साठा आढळला. तसेच तेथे वजन काटे, वेष्टनासाठी लागणारे साहित्यही मोठ्या प्रमाणावर आढळले. कारवाईदरम्यान भुजवाला याच्या निवासस्थानाहून जप्त करण्यात आलेली सव्वादोन कोटींची बेहिशोबी रोकड एमडी विक्रीतून गोळा के लेली असावी, असा संशय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here