Home महाराष्ट्र स्व.मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन

स्व.मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन

435
0

दै.मराठवाडा साथी व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई च्या वतीने दर्पण दिनाच्या पार्श्वभुमीवर पुरस्कार उपक्रमाची घोषणा


औरंगाबाद (प्रतिनिधी-)
दै.मराठवाडा साथी व महाराष्ट्र राज्य पत्रकारसंघ मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने दै.मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या स्मरणार्थ सकारात्मक वार्तालेखन पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून 5 जानेवारीपर्यंत यासाठी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या सकारात्मक बातम्या, लेख आदी साहित्य पाठविण्यात यावे असे आवाहन मराठवाडा साथी व म.रा.पत्रकार संघ मुंबईच्या वतीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
दै.मराठवाडा साथी व महाराष्ट्र राज्य पत्रकारसंघ मुंबई यांच्या वतीने या वर्षीपासून पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी स्मृती पुरस्कार सुरु करण्यात येत आहे. स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा पुरस्कार राज्यस्तरीय स्वरुपाचा असून यासाठी दि. 5 जानेवारीपर्यंत आपले साहित्य पत्रकारांनी पाठवायचे आहे. म.रा.पत्रकारसंघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व दै.मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. दि. 1 जानेवारी ते डिसेंबर 2020 पर्यंत दैनिक, साप्ताहिक अथवा मासिक यामध्ये प्रकाशित झालेली कात्रणे संपादकांच्या शिफासरपत्रासह 5 जानेवारी 2021 पर्यंत पाठवायची आहेत. 6 जानेवारीला दर्पण दिनाच्या औचित्यावर पुरस्कार प्राप्त मान्यवर पत्रकारांच्या नावाची घोषणा करण्यात येईल.
कात्रणे दत्तात्रय काळे, वृत्तसंपादक मोबा. 9607072505 व म.रा.पत्रकार संघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू गोरे मोबा. 9075716739 या व्हॉटस्अप क्रमांकावर पाठवायची आहेत. राज्यस्तरीय जिल्हानिहाय तीन पुरस्कार तर प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रवेशिका पाठविणार्‍यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकार बांधवांनी या पुरस्कारासाठी सकारात्मक वार्तालेखन साहित्य पाठवून सहभागी व्हावे, असे आवाहन म.रा.पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here