Home नाशिक अजित पवारांचे सरकारला खडे बोल म्हणाले ,सरकारने अनुदान देताना थट्टा करु नये

अजित पवारांचे सरकारला खडे बोल म्हणाले ,सरकारने अनुदान देताना थट्टा करु नये

399
0

नाशिक : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्याला या संकटकाळात सावरण्यासाठी मदत व्हावी म्हणून आम्ही अधिवेशनात हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली अन् सरकारने तीनशे रुपये जाहीर केले.आम्ही पुन्हा अनुदान वाढवण्याची मागणी केली तर साडे तीनशे रुपये अनुदान देण्यात आले. असे अनुदान देताना सरकार शेतकऱ्याची थट्टा करत आहे असा घणाघात अजित पवार यांनी राज्य सरकार विरोधात केला. नाशिक येथे पत्रकारांशी ते बोलत होते.अजित पवार म्हणाले, आम्ही सरकारला सांगितले, ज्याप्रकारे तुम्ही अनुदान देत आहात ही थट्टा आहे. आम्ही वेगवेगळे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. अधिवेशन 25 तारखेला संपले. बरेच ठिकाणी ऐकू येत आहे की, केंद्र बंद आहे.
कांदा खरेदी सुरु झाली पाहीजे. कर्मचाऱ्यांच्या संप काळात काही शेतकऱ्यांना मदत पोहचली नाही. हरभरा केंद्र देखील आणखी सुरू करावे. याविषयी मी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधणार आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here