Home आरोग्य इअरफोन किंवा हेडफोन अतिवापर शरिरासाठी घातक

इअरफोन किंवा हेडफोन अतिवापर शरिरासाठी घातक

244
0

अनेकजण दिवसभर कानात इअरफोन किंवा हेडफोन घालतात. जर तुम्ही देखील या लोकांपैकी एक असाल तर सावध व्हा कारण सतत इयरफोनचा वापर तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.हेडफोन व इअरफोनचा अतिवापर आपले ह्दय,रक्तदाब तसेच कानाच्या आजाराना आंमत्रित करत आहे.60 मिनिटापेक्षा जास्त वेळ इअरफोन चा वापर 75 डीबीपेक्षा जास्त आवाजात केल्यास कान खराब होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.75 डीबीपेक्षा कमी आवाजात1 तास इअरफोन चा वापर केला जावु शकतो.

हेडफोन कानात उष्णता निर्माण करते त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका संभवतो तसेच इअरफोन जास्त वेळ वापरल्या ने कानाच्या नसावर ताण येतो व कानाच्या नसा सुजतात व हिअरिंगसेल्स वर परिणाम होतो कानसुन पडतात.

डोकेदुखीची समस्या वाढु शकते तसेच झोप कमी होणे, चक्कर येणे अशा समस्या उद्भवतात.

इअरफोन्सची देवाणघेवाण केल्याने कानात संसर्ग होण्याचा धोका वाढतो, कारण दुसऱ्याच्या कानातले बॅक्टेरिया त्यात असलेल्या स्पंजद्वारे तुमच्या कानात येतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही तुमचा इअरफोन दुसऱ्याला द्या, तेव्हा तो परत मिळाल्यावर स्पंज साफ केल्यानंतरच वापरा.

अशाप्रकारे कानांचे इयरफोनने संरक्षण करा हेडफोन आणि इअरफोन्सचा जास्त वेळ वापर करणे टाळा. हेडफोन आणि इयरफोन वापरताना दोन्हीचा आवाज सामान्य ठेवा. शक्यतो तुमचा हेडफोन किंवा इअरफोन कोणाशीही शेअर करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here