Home क्राइम व्हॉट्सअॅपवरून बिहार मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

व्हॉट्सअॅपवरून बिहार मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

806
0

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना व्हॉट्सअॅपवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलंय.
धमकी प्रकरणी पाटणा सचिवालय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला पाटण्यात आणण्याची तयारी सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बिहार पोलीस आणि गुजरात पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आरोपी तरुणाला सुरतच्या लाना येथून अटक करण्यात आलीये. अंकित मिश्रा असं धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे. त्याला सुरतमधील लस्करा येथून अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी बिहार पोलीस सुरतला पोहोचले होते. सुरत पोलीस या संपूर्ण प्रकरणावर थोड्याच वेळात पत्रकार परिषदही घेऊ शकतात. मात्र, एडीजीपी मुख्यालय आणि पाटणा एसपी या संपूर्ण प्रकरणावर काहीही सांगण्यास तयार नाहीये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here