Home मनोरंजन अर्णब गोस्वामींचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला !

अर्णब गोस्वामींचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला !

534
0

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्णब गोस्वामी यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला आहे. नियमाप्रमाणे जामीनासाठी आधी सत्र न्यायालयात याचिका करावी असे निर्देश उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना दिले आहेत. त्यामुळे आता अजून किती दिवस अर्णब यांचे तुरुंगातील दिवस वाढले आहेत.दरम्यान उच्च न्यायालयात सुनावणी होण्याच्या अर्धा ते एक तासापूर्वी अर्णब गोस्वामी यांनी जामीनासाठी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.तर दुसरीने चार दिवसात निकाल देण्याचे निर्देश हायकोर्टाने सत्र न्यायालयाला दिले आहेत. चार दिवसात सत्र न्यायालयात सुनावणी झाली नाही तर अर्णब गोस्वामी यांची दिवाळी तळोजा कारागृहातच होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here