Home मनोरंजन ….. यासाठी केल्या दीपिकाने जुन्या पोस्ट डिलिट !

….. यासाठी केल्या दीपिकाने जुन्या पोस्ट डिलिट !

203
0

‘माय ऑडिओ डायरी’ हा पहिला नवा विडिओ दीपिकाने पोस्ट केला आहे.

राजस्थान : दीपिकाने अचानकच सोशल मीडियावरील आपल्या सर्व पोस्ट डिलिट करत चाहत्यांना एक धक्का दिला होता. इंस्टाग्राम ,ट्विटरवरील सर्व पोस्ट तिने नवं वर्षात डिलिट केल्या . आणि आजच तिने एक पोस्ट टाकत परत सोशल मीडियावर ती ऑन झाली आहे. या पोस्टमध्ये तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘माय ऑडिओ डायरी’ असं या व्हिडीओचं नाव असून त्यात दीपिकाने तिच्या मनातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. नव्या वर्षाची सुरुवात नव्या उमेदीने करण्याचं ती या विडिओमध्ये म्हणत आहे.यासाठीच तिने जुन्या पोस्ट डिलिट केल्याचे म्हटले जात आहे.

“हाय सर्वांना. माझ्या ‘माय ऑडिओ डायरी’मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून मी माझे विचार आणि भावना मांडत आहे. मला खात्री आहे की २०२० हे वर्ष सगळ्यांसाठी थोड कठीण होते. माझ्यासाठी सुद्धा हे वर्ष काहीसं असंच गेलं. २०२१ हे वर्ष सगळ्यांना चांगलं जावो हीच मी प्रार्थना करते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा,” असं म्हणत दीपिकाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here