Home मुंबई बाबांच्या निर्णयाचं दु:ख, मात्र मी भाजपमध्येच -खा.रक्षा खडसे

बाबांच्या निर्णयाचं दु:ख, मात्र मी भाजपमध्येच -खा.रक्षा खडसे

339
0

मुंबई : नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला . राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपण भाजप नेतृत्वावर नाराज नसून देवेंद्र फडणवीसांमुळं राजीनामा देत असल्याचं खडसेंनी सांगितलं. आपलं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला असल्याचं खडसे म्हणाले. . येत्या शुक्रवारी ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान खडसे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या सूनबाई भाजप खासदार रक्षा खडसे काय निर्णय घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. मात्र आपण भाजपमध्ये राहणार असून पक्ष सांगेल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचं रक्षा खडसे या म्हणाल्या.

खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, बाबांचा (एकनाथ खडसे) निर्णय दु:खद आहे. मी भाजपकडून निवडून आलेली आहे. लोकांनी मला भाजपकडून निवडून दिलंय. त्यामुळं मी पक्षातच राहणार आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती पूर्ण करणार. नाथाभाऊंनी देखील पक्षाचं योगदान मान्य केलंय. 40 वर्ष त्यांनी पक्ष वाढवला. मात्र आज त्यांनी व्यक्तिगत कारणांमुळं त्यांनी राजीनामा दिलाय, असं त्या म्हणाल्या.

रक्षा खडसे म्हणाल्या की, बाबांनी माझ्यावर कधीच कुठला दबाव टाकलेला नाही. त्यांचं आणि माझं मत जनतेची सेवा करणं हेच आहे. मी कधीपर्यंत पक्षात राहणार याचं भाकित कुणीच करु शकत नाही. कुणाबाबतच असं भाकित आपण करु शकत नाही. आता आपण भाजपमध्येत असल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here