Home मुंबई “स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत ”- प्रसाद लाड

“स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत ”- प्रसाद लाड

219
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यात शाब्दीक चकमक सुरू आहे. “जनतेनं मला सलग सहा वेळा निवडून दिलं. प्रसाद लाड यांनी किमान एकदा तरी जनतेतून निवडून येऊन दाखवावं,” असं आव्हान खडसे यांनी दिलं होतं.

दरम्यान, प्रसाद लाड यांनीदेखील एकनाथ खडसे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “स्वतःची एवढी ताकद होती, तर स्वतःच्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत?,” असा सवाल लाड यांनी केला आहे. “स्वतःची एवढी ताकद होती, तर स्वतःच्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत? मी नक्कीच स्वतः ७ वेळा निवडून येईन याची मला खात्री आहे,” असं लाड म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून खडसे यांच्यावर निशाणा साधला. “आजवरच्या राजकारणात भाजपा संघटना आणि रा.स्व.संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत. तरीही पक्ष नेतृत्वाला दोष देऊन पक्ष त्याग केला. ज्या पक्षाने एवढं दिलं, अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पदं उपभोगली, तेच नेते आता इतरांना शिकवत आहेत,” असंही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here