Home लाइफस्टाइल नव्या स्टाईलच्या चपलांची तरुणाईला भुरळ

नव्या स्टाईलच्या चपलांची तरुणाईला भुरळ

91
0

प्रतिक्षा पगारे/मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद । दिवाळीच्या मुहूर्तावर सध्या मार्केटमध्ये सर्वत्र खरेदी करण्याकरीता ग्राहकांची गर्दी बघायला मिळत आहे. दिवाळीमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी जेवढी चढा-ओढ असते. तेवढीच तरुणींमध्ये आपल्या ड्रेसवर मॅचिंग किंवा सर्वात वेगळी (नवीन प्रकारची) सँडल चप्पल किंवा शूज खरेदी करण्यासाठी धावपळ सुरु आहेे. त्यामुळे सध्या मार्केटमध्ये नवीन प्रकारच्या सँडल्स, चप्पल्स आणि शूजची मागणी वाढली आहे. आणि नवीन आलेल्या सँडल्स आणि चप्पल्स तरुणींना भूरळ पाडत आहेत.

न्यू कोल्हापुरी :
कोल्हापुरची फेमस कोल्हापुरी चप्पल तर प्रत्येकालाच माहित आहे. त्याच कोल्हापुरीला न्यू स्टोन टच देऊन नवीन कोल्हापुरी तरुणींसाठी मार्केटमध्ये आली आहे. वेगवेगळ्या रंगांमध्ये ही चप्पल उपलब्ध असून अतिशय क्षुल्लक किंमतीत म्हणजेच फक्त १५० रु.मध्ये ही आपल्याला विकत घेता येईल.

वडापाव चप्पल
नाव ऐकून जरी आपण खाणाऱ्या वडापावची आठवण आली तरी दोन्हींमध्ये फार फरक आहे. ही चप्पल वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असून १५० रु. पर्यंत आपल्याला सहज उपलब्ध आहे.

वुमेन फ्लॅट क्रिस्टल सँडल
या सँडलच्या नावाप्रमाणेच तिच्यावर क्रिस्टल्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे पार्टीजसाठी असो अथवा फॅमिली फंक्शन करीता. कोणत्याही ओकेजनमध्ये ही सँडल आपण परिधान करू शकतो. हिची किंमत १,३०० रु आहे.

सँडल शॉप मालक : शकील खान

मी मूळचा परभणीला राहणारा आहे. मात्र, गेल्या ३ ते ४ वर्षांपासून मी औरंगाबाद मध्ये ही शॉप चालवतो.कोणताही सण असल्यावर तरुणींची मोठ्या प्रमाणात नवीन सँडल्स, चप्पल आणि शूज घेण्यावर भर असतो. या वर्षी कोरोनामुळे नवीन स्टॉक जास्त आला नाही, मात्र तरी सुद्धा तरुणींच्या मागण्यापूर्ण करण्याकरीता आम्ही प्रयत्न करतो. सध्या मोठ्या प्रमाणात तरुणी रोज वापरता येतील अश्या प्रकारच्या सँडल्स घेण्यावर भर देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here