Home मुंबई ऑनलाइन परीक्षेत रांगा लागल्या कंपन्यांच्या

ऑनलाइन परीक्षेत रांगा लागल्या कंपन्यांच्या

571
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : राज्यात विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय झाल्यानंतर काही खासगी कंपन्यांनी कॉलेजांच्या बाहेर रांगा लावल्या आहेत. यामुळे प्राचार्यांच्या डोक्याला नवा त्रास सुरू झाला आहे.विद्यापीठाने अंतिम वर्ष परीक्षा ऑनलाइन घेण्याचे जाहीर केले. यातच ही परीक्षा कशी घ्यायची, त्याची प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते उत्तरपत्रिका तपासून देण्यापर्यंतचे सर्व काम कॉलेजांवर सोपवले आहे. यामुळे अनेक खासगी कंपन्यांनी कॉलेजांच्या बाहेर रांगा लावल्या आहेत. या कंपन्या कॉलेजांना त्यांच्याकडील अभ्यासक्रमांनुसार प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यापासून ते ऑनलाइन परीक्षा घेण्यापर्यंतची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवित आहेत. याबचेबर उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करून निकालही हाती देण्याची तयारी या कंपन्या दर्शवत आहेत. मात्र, यासाठी बहुतांश प्राचार्यांनी नकार दिला आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षांचे नियोजन कॉलेजांना करायचे असल्यामुळे कॉलेजांवर विशेष ताण आला आहे. हा ताण दूर करण्यासाठी या कंपन्या पुढाकार घेत आहेत.यातील कंपनी नियुक्त करायची झाली, तरी त्यासाठीचे पैसे कोण व कसे देणार, असा प्रश्न कॉलेजांसमोर आहे. विद्यार्थ्यांकडून जमा होणारे परीक्षा शुल्क हे विद्यापीठाकडे जमा असल्याने कॉलेजांकडे परीक्षांच्या नियोजनासाठी निधीच उपलब्ध नाही. यामुळे बहुतांश कॉलेजांनी या कंपन्यांना नकार देत सर्व जबादारी प्राध्यापकांवर सोपवली आहे. मात्र, नियमित परीक्षा होतात तेव्हा प्राध्यापकांना प्रश्नपत्रिका तयार करणे, तसेच त्याचे मूल्यांकन करणे यासाठी मानधन मानधन दिले जाते. तसे मानधन यंदाही दिले जावे, अशी मागणी प्राध्यापकांकडून होत आहे. याबाबत विद्यापीठ काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here