Home मनोरंजन अभिषेक बच्चन च्या ह्या लूकमुळे त्याला ओळखणे ‘अशक्य’…!

अभिषेक बच्चन च्या ह्या लूकमुळे त्याला ओळखणे ‘अशक्य’…!

371
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘बॉब बिस्वास’ च्या शूटिंग मध्ये व्यस्थ आहे.या मुव्हीसाठी अभिषेकचा मेकओव्हर करण्यात आला आहे. त्याचे बदललेले रूप हैराण करणारे आहे कारण या रुपात त्याला सहज ओळखता येणे अशक्य आहे.

गाजलेल्या ‘कहानी’ या चित्रपटातील एक कॅरेक्टर ‘बॉब बिश्वास’ वर आता पूर्ण चित्रपट बनविला जात असून त्यात अभिषेक मुख्य भूमिकेत आहे. सुजोय घोष यांनी कहानीचे दिग्दर्शन केले होते आणि निर्माते होते जयंती गड. या चित्रपटातील एका कॅरेक्टरवर चित्रपट बनविण्यासाठी गडा यांची रीतसर परवानगी घेतली गेल्याचे समजते. दरम्यान,नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजोय यांची कन्या अन्नपूर्णा करणार असून त्यात अभिषेक बरोबर चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत दिसेल. अभिषेक सध्या कोलकाता येथे शुटींग मध्ये व्यस्त असून हे शहर म्हणजे त्याचे दुसरे घर आहे असे तो म्हणतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here