Home Uncategorized कार – ट्रकच्या अपघात दहा वर्षीय बालक ठार

कार – ट्रकच्या अपघात दहा वर्षीय बालक ठार

205
0

मराठवाडा साथी न्युज

बीड : बीडहून मांजरसुंबाकडे जाणार्‍या कारला मांजरसुंब्याहून बीडकडे येणार्‍या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात पती-पत्नीसह त्यांची दोन मुले जखमी झाली असून यात त्यांचा १० वर्षाचा नातलग मयत झाल्याची घटना घडली. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की, गोविंद गिन्यानदेव पवार हे आपल्या पत्नी व मुलांसह आणि एका लहान नातलगासह बीडहून मांजरसुंब्याकडे कार (क्र. एम.एच. ०२ डीआय ९४५९) ने जात होते. या वेळी समोरून येणारा ट्रक (क्र. एन. आर. ५५ ए.एच. ०१७६) ने जोराची धडक दिल्याने या अपघातात गोविंद पवार, त्यांची पत्नी रुपाली पवार व त्यांचे दोन मुले जखमी झाले तर त्यांच्या सोबत असलेला १० वर्षांचा आदर्श नवनाथ राठोड हा जागीच मयत झाला. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here