Home बीड पोहण्यासाठी गेलेला युवक गोदापात्रात बुडाला

पोहण्यासाठी गेलेला युवक गोदापात्रात बुडाला

दीड वाजता सापडला मृतदेह

375
0

गेवराई : माहिती गावकर्‍यांसह प्रशासनाला झाल्यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला होता. दुपारी दीड वाजता त्याचा मृतदेह गाळात फसलेल्या अवस्थेत आढळून आला.  तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी आणि चकलांबा पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी तळ ठोकून होते. गावकरीही बोटद्वारे त्याचा शोध घेत होते.
अविनाश जगदीश नाटकर (वय १७, रा. राक्षसभुवन) हा युवक सकाळी ९ वाजता गोदावरी नदीच्या पात्रामध्ये पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना तो बुडाला. याची माहिती गावकर्‍यांना झाल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. शोधासाठी बोट आणि चप्पुचा वापर करण्यात आला. दुपारी दीड वाजता गाळामध्ये फसलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.  तहसीलदार सचिन खाडे, मंडल अधिकारी, तलाठी वाकोडे, चकलांबा पोलिस ठाण्याचे पीआय झिंजुर्डे यांच्यासह कर्मचारी त्याठिकाणी तळ ठोकून होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here