Home मराठवाडा द ग्रेट टॅलेंट शो राज्यस्तरीय स्पर्धेचे सोमवारी बक्षीस वितरण!

द ग्रेट टॅलेंट शो राज्यस्तरीय स्पर्धेचे सोमवारी बक्षीस वितरण!

ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

820
0

परळी l राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत व दै.मराठवाडा साथी आयोजित द ग्रेट टॅलेंट शो स्पर्धेचे परळीत आयोजन करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे ही राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होत आहे. आज सोमवार दि.09 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास प्रख्यात किर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प.समाधान महाराज शर्मा, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, थर्मल पॉवर स्टेशनचे मुख्याभियंता शिंदे, दि इंडिया सिमेंट लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शशि मुखिजा, परळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे, नायब तहसीलदार बि. एल.रुपणर, गटशिक्षण अधिकारी रंगनाथ राऊत, पो.नि. हेमंत कदम, पो.नि.बाळासाहेब पवार, आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
कोरोना लॉकडाऊन नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या स्तरावर एखाद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. द ग्रेट टॅलेंट शो स्पर्धेत कोणत्याही कलेने निपुण असलेल्या स्पर्धकांना सहभागी आले. चार दिवस ऑडिशन आणि शेवटच्या दिवशी फायनल राउंड संपन्न झाल्यानंतर आज मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न होणार आहे. गायन, वादन, कला, डान्स, मेहंदी, स्टाईल आदींसह विविध क्षेत्रातील कलाकारांना या स्पर्धेमुळे राज्यव्यापी संधी मिळाली आहे. याच व्यासपीठावरून अनेक भविष्यातील गुणवंत कलाकार उदयास येणार आहेत. एकापेक्षा एक सरस स्पर्धकांमधून विजेत्या झालेल्या स्पर्धकांना आज मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार करण्यात आली. मराठवाडा साथी पीसीएन न्यूजवरसुद्धा या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. सर्वच वयोगटातील स्पर्धकांसाठी ही स्पर्धा खुली होती. राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट, संचलित बचपन प्ले स्कुल व पोदार स्कुलच्या कर्मचाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. पोदार स्कुलचे प्राचार्य बि. पी.सिंग, प्रशासक धीरज बाहेती आणि बचपन स्कुलच्या प्राचार्या सौ.दीपा बाहेती यांनी आजच्या बक्षीस वितरण कार्यक्रम उपस्थित राहावे असे आवाहन सर्व स्पर्धक आणि त्यांच्या नातेवाईकांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here