Home महाराष्ट्र ब्लॅंकमेल करणार ;मुंडे…

ब्लॅंकमेल करणार ;मुंडे…

255
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती असे मुंडे म्हणाले. परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिल्याचेही ते म्हणाले. २०१९ पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.

माझ्या जिवाला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा आल्याचे मुंडेंनी पुढे म्हटलंयय या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. १२ नोव्हेंबर 2020 रोजी मे 2019 पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आल्याचे ते म्हणाले. रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईलवरून मला ब्लॅंकमेलिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये मागितल्याचे एसएमएसरुपी पुरावे असल्याचे मुंडेंनी म्हटलंय.मुंबईतल्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली आपल्यावर २००६ पासून अत्याचार सुरु होते असं तिने तक्रारीत सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here